Breaking News

नामदेवराव परजणे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल


कोपरगाव ता. प्रतिनिधी

तालुक्यातील संवत्सर येथील प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ, लोणी संचलित नामदेवराव परजणे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच १२ वी विज्ञान शाखेचा ९४. ८७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९७. ५९ टक्के आणि कला शाखेचा ७२. ८८ टक्के निकाल लागला. 

या महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत जगताप गितांजली जनार्दन हिला ८०. ६१ टक्के गुण मिळाले असून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जाधव आश्विनी संतोष ७९. ५३ टक्के {द्वितीय}, सिनगर आशिती विनायक ७८. ७६ टक्के {तृतीय} कला शाखेतून पंडोरे आरती अशोक ७२ टक्के {प्रथम}, फटांगरे पुजा भाऊसाहेब ६७. २३ टक्के {द्वितीय}, विज्ञान शाखेतून जाधव भाग्यश्री सुरेश ६८. ९२ टक्के {प्रथम}, परजणे अनिकेत सुधाकर ६३. ६१ गुण मिळवून द्वितीय आला.

विद्यार्थ्यांचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, महाविदयालयाचे सेक्रेटरी डॉ. अनिलकुमार पुंड, समन्वयक कदम तसेच प्राचार्य प्रा. युवराज सदाफळ यांनी यशस्वी विदयार्थ्याचे कौतूक केले.