Breaking News

वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज : डॉ. खर्डे


कोल्हार : प्रतिनिधी 
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, सामाजिक बांधिलकी आणि वैयक्तिक जबाबदारी म्हणून वृक्षलागवड केली पाहिजे. संपूर्ण जग प्रदूषणाच्या भयंकर विळख्यात सापडले आहे. या गंभीर कारणाला जबाबदारही आपणच आहोत. प्रदूषणासाठी जेवढा माणूस जबाबदार आहे, तेवढयाच जबाबदारीने समाजातील सर्व घटकाने पुढे येऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन केले पाहिजे. कारण ही आजच्या काळाची तीव्र गरज बनली आहे, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. भास्कराव खर्डे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार (ता. राहाता) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संभाजीराजे देवकर होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. आर. वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. डॉ. खर्डे म्हणाले, महाविद्यालयाने विखे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिकजाणीवेतून वृक्षारोपण केले. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. झाडे लावून साजरा केलेला वाढदिवस खऱ्या अर्थाने वाढदिवस
म्हणता येईल. सर्वच राजकीय नेत्यांनी असे वाढदिवस साजरे केले तर समाजातील सर्वच प्रकारचे प्रदूषण नक्की दूर होईल.

याप्रसंगी साहेबराव दळे, अशोक असावा, बाबासाहेब दळे, रावसाहेब खर्डे, उपप्राचार्य प्रा. अनिल लांडगे, डॉ. अर्चना विखे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. राजेंद्र सलालकर, डॉ.सोपान डाळिंबे, डॉ. राजेंद्र वडमारे, प्रा. परमेश्वर विखे, प्रा. पांडुरंग औटी, डॉ. प्रवीण तुपे, प्रा. राकेश माळी, डॉ. विजय खर्डे, प्रा. पांडुरंग औटी, प्रा. विजय दिघे, प्रा. विनोद कडू, डॉ. प्रकाश पुलाटे, आदिनाथ दरंदले, अमोल खर्डे, असिफ पठाण, डॉ. प्रतिभा विखे, प्रा. अमृता म्हस्के, प्रा. कविता राउत, राणी गायकवाड, योगिता सोनवणे, दीपक भाने, अनिल आहेर, पंडित आंधळे, युनूस शेख, अनिल देवकर उपस्थित होते. प्रा. अनिल लांडगे यांनी आभार मानले.