Breaking News

नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे पद रद्द तुळजाभवानी अनुदान घोटाळा


उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी यात्रा अनुदान आणि घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्याचा आदेश काढला आहे. यापुढे गंगणे यांना हे पद स्वीकारता येणार नाही. माहिती अ धिकार कार्यकर्ते राजा माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पद रद्द करण्यासाठी मागणी केली होती. श्री तुळजाभवानी यात्रा अनुदानात 1 कोटी 62 लाखाचा तर घरकुलात 2 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात मुख्य आरोपी तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे होत्या. तसेच नगरसेवक, नगरपरिषदेच्या अभियंत्यासह मुख्याधिकारी यांचाही आरोपीत समावेश आहे. या दोन्ही प्रकरणात 2 वेगवेगळे गुन्हे तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
हा घोटाळा बाहेर काढण्यापासून ते जबाबदार असलेल्या अधिकार्‍यावर आणि नगर परिषदेच्या सदस्यावर गुन्हे दाखल क रण्यापर्यंतचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते राजा मानेंनी केला आहे. सातत्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यामुळेच दोन महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे हे स्वतःहून पोलिसांना शरण आले होते.
या प्रकरणात वारंवार नगराध्याक्षांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. सन 1965 च्या अधिनियमानुसार नगराध्यक्षा अर्चना गंगणे या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे.