Breaking News

पंढरीत मंगळवारी पहिले परिवर्तन साहित्य संमेलन

सोलापूर, दि. 24, जून - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त पहिले परिवर्तन साहित्य संमेलन 26 जून रोजी मंगळवारी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
श्री. सर्वगोड म्हणाले, संत तनपुरे महाराज मठामध्ये आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलांचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार आहे. सुनील सर्वगोड, प्रा. वामन जाधव यांच्या उपस्थित उद्घाटन समारंभ होणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत परिसंवाद शिवशाही ते भीमशाही या विषयावर श्रीमंत कोकाटे, प्रा. डॉ. विजय मोरे यांचे मार्गदर्शन रामदास महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी अडीच ते चार या वेळत ’भीमाई माऊली मायेची सावली’ हा प्रशांत मोरे यांच्या काव्य मैफलीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सहा यावेळेत ’मानवी मूल्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या वेळी अर्जुन डांगळे व डॉ. टी. एस. मोरे हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे व परशुराम वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे क रणार आहेत. सायंकाळी सात ते 10 या वेळेत एल्गार सांस्कृतिक मंचाकडून जागर समतेचा संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा हा कार्यक्रम होणार असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड यांनी सांगितले. संमेलनाची तयात करण्यात येत असून सर्वांनी पहिले परिवर्तन साहित्य संमेलनास उपस्थितीचे आवाहन करण्यात आले.