Breaking News

मेढ्यात चंदन व वाहनांसह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा, दि. 24, जून - जावली वनविभागाने आज एका धडक कारवाईत साठ लाखाचे चंदन व वाहतूक करणारी बोलेरो जीप असा दोन लाख सत्तर हजारांचा मुद्देमालासह एक महिला व वाहनचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी सचिन डोंबाळे यांना खबर्याने दिलेल्या माहितीनुसार चोरटी चंदन वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार डोंबाळे यांनी कर्मचार्यांना घेऊन सापळा लावला होता आणि या सापळ्यात सावज अलगद सापडले 
सकाळी साडेआठच्या सुमारास मेढा महाबळेश्‍वर रस्त्यावर गवडी गावाच्या हद्दीत संशयित बोलेरो जीप आली असता वनविभागाच्या कर्मचार्यानी ती अडवून तपासणी केली तेंव्हा एक महिला व चंदन कटाईची हत्यारांसह तेवीस किलो सोलिव चंदनाचे लाकूड मिळून आले या चंदनाची अंदाजे किंमत साठ हजार असून दोन लाख पंधरा हजाराची बोलेरो जीप असा पाऊने तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी आंबेघर येथील राहणारी महिला बुंडी पारधी व वाहनचालक यांना वनविभागाने ताब्यात घेऊन वननियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.