Breaking News

राज्यात 1 नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री पीओएस मशीनद्वारे करणे बंधनकारक

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - राज्यात 1 नोव्हेंबरपासून अनुदानित खतांची विक्री पॉईंट ऑफ सेल’ (पीओएस) मशीनच्या माध्यमातून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या  माध्यमातून खतांची विक्री करणारे महाराष्ट्र हे देशातील मोठ्या राज्यांपैकी पहिले राज्य ठरणार आहे. पुढील तीन दिवस विशेष मोहिम घेऊन खतांचा साठा ॠपीओएस’ मशीनवर नोंद विण्यात येणार आहे. यापुढे पीओएस’ मशीनद्वारे विक्री केलेल्या खतांवरच अनुदान देय राहील. यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.
अनुदानित खतांमध्ये युरीया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट (एस.एस.पी), संयुक्त खते यांचा समावेश होतो. आज मध्यरात्रीपासून राज्यात परवानाधारक अनुदा नित खत विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या खतांच्या साठ्याचा हिशोब करून त्यांची नोंद पीओएस’ निगडीत संगणकीय प्रणालीवर आणणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यासाठी  28 ते 30 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबवून खतांचा साठा पीओएस’ मशीनमध्ये नोंदविला जाणार आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वितरक मशीन घेऊन येणार असून नों दीची मोहिम राबविली जाणार आहे.
राज्यात 20 हजार 988 अनुदानित खत वितरक असून त्यांना प्रत्येकाला ॠपीओएस’ मशीन मोफत वाटप करण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 60 लाख मेट्रीक टन अनुदा नित खतांची विक्री होते. त्यामध्ये खरीप हंगामात 33 लाख मेट्रीक टन आणि रब्बी हंगामात 27 लाख मेट्रीक टनाची उलाढाल होते. 1 नोव्हेंबरपासून या मशीनच्या माध्यमातूनच  अनुदानित खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. अनुदानित खते खरेदी करतांना शेतकर्‍यांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. खत खरेदीसाठी शेतक र्‍याने दुसर्‍या व्यक्तीस पाठवले तर त्याचाही आधार क्रमांक नोंदविण्यात येणार आहे. या खताचे अनुदान संबंधित कंपनीच्या खात्यावर थेट जमा होणार आहे.