Breaking News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रथमच घेण्यात आलेल्या क्रेडिट कोर्स बी.सी.ए.(सायन्स) मध्ये आकाश राजपूत प्रथम

नगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम के्रडिट कोर्स बी.सी.ए.(सायन्स) अभ्यासक्रमात अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थी आकाश अपलेशसिंग राजपूत याने 9.850 के्रडिट मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. काजल राजेंद्र जोशी हिने 9.380 के्रडिट मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. कु. शीतल साजन मनजापल्ली हिने 9.23 के्रडिट मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालच्या वतीने त्यांचा प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सय्यद रजाक, डॉ.अरविंद नागावडे, डॉ.बी.एम.गायकर, डॉ.वेगस डॉमनिक, डॉ. रजिस्ट्रर ए.वाय.बळीद आदी उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अंतर्गत यापूर्वी पदव्युत्तर कोर्सेसाठी के्रडिट कोर्स सिस्टमचा अवलंब केला जात होता. पदवीपूर्व (अंडर ग्रॅज्युएट) बी.सी.ए. (सायन्स) या अंडर ग्रॅज्युएट कोर्सकरिता के्रडिट कोर्स सिस्टमचा अवलंब केला आहे. हा एकमेव कोर्स असून अहमदनगर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून अहमदनगर महाविद्यालयाचे अभिमान वाढवले आहे. तरी सर्वत्र या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.