मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर व भेसळयुक्त दूधाचा आहेर
दूध व शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पिपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर,मोझांबिकचीतूर,तर गुजरात, आंध्र व कर्नाटकचे भेसळयुक्त दूधाचा आहेर आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर शेतकर्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे देशाचे कृषीमंत्री राधामोहनसिंग व सिने अभिनेत्री रविना टंडन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भेसळयुक्त दूध पाजून निषेध व्यक्त करण्यात आला.
आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या प्रतिकात्मक अस्थिकलशाला अभिवादन करुन आंदोलनास प्रारंभ करण्यात आले. शेतकरी वाचवा, आत्महत्या थांबवा च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणानून निघाला. या आंदोलनात अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, एम.डी. ढाळे, लक्ष्मण बोठे, चोभे मास्तर आदिंसह शेतकरी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी आणलेली पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर व भेसळयुक्त दूध निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या टेबलवर ठेवले असता, पोलिसांनी तातडीने सदर सामान ताब्यात घेतले. या दरम्यान आंदोलकांची व निवासी उपजिल्हाधिकार्यांची शाब्दिक चकमक उडाली.
शेती मालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत भाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात आला आहे. शेतकर्याचा जोडधंदा असलेल्या दूधाला योग्य भाव नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना जगणे कठिण झाले असताना राज्यात सुमारे तीन लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकारने पाकिस्तानची साखार तर मोझांबिक देशातून तूर आयात केली. मात्र सरकारला देशातील तूरीला हमीभाव देता आले नाही.