Breaking News

दोन कोटी रुपयांच्या पाच बंधार्‍यांची कामे अडवली

सोलापूर, दि. 03, जून - ठेकेदारी फर्मच्या स्वत: ठेकेदारी घेताना कामे मंजूर झाली नसल्याने जवळपास दोन कोटी रुपयांच्या पाच बंधार्‍यांची कामे अडवून धरल्याचा धक्कादायक प्रकार उघडक ीला आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्याच्या दुष्काळी भागातील जलसंधारणची ही कामे लघु सिंचन (जलसंधारण) विभागातील उप अभियंत्याने अडवली आहेत. ’वर’पर्यंत पोहोच असलेल्या या अधिकार्‍यापुढे संबंधित विभागाचे अधिकारीही हतबल झाले आहेत. 

उत्तर सोलापूर तालुक्याचा समावेश अवर्षणप्रवण भागात होतो. सीनाकाठचा भाग सोडल्यास वडाळा, रानमसले परिसराला कायम दुष्काळाचे चटके सोसावे लागतात. साठवण तलाव, पाझर तलाव यावरच पाणी स्तोत्रावर भिस्त आहे. तालुक्याच्या या भागातून वांगिरा ओढा वाहतो. याला पावसाळ्यात चांगलेच पाणी वाहते. हे पाणी पुढे मोहोळ तालुक्यात सीना नदीला मिळते. शासनाने हे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी वांगिरा नाला पुनर्जिवन प्रकल्प राबवला. त्या अंतर्गत उत्तर सोलापूरमधील ओढ्यावर पाच मोठे बंधारे मंजूर केले. सन 2016-17 मध्ये या बंधार्‍याना तांत्रिक मंजुरी मिळाली. त्यांतर कामाची निविदा निघाली. सप्टेंबर 2017 मध्ये मंजूर झाली. त्यानंतर आजतागायत या कामाला सुरवात झाली नाही. यासंदर्भात चौकशी केली असता याविभागाचे उप अभियंता एस. ए. कोरे यांनी संबंधित ठेकेदाराला लाइन आऊट आखून न दिल्याने काम सुरू करता आले नाही, असे सांगितले.