Breaking News

आयटीआय प्रवेश क्षमतेत अडीच हजाराने वाढ

पुणे, दि. 03, जून - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या 2 हजार 500 प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत. यंदा आयटीआय प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमता 1 लाख 36 हजार 193 इतकी आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली. शासकीय व खासगी आयटीआय प्रवेशासाठी तात्पुरता प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबत संचालनालयाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतील. मात्र यंदा खासगी नवीन आयआयटी संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन खासगी आयटीआय सुरू होणार असल्याने, प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे. यंदा अडीच हजार आयटीआयच्या जागा वाढल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे.राज्यात शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशाची क्षमता 93 हजार 672 आहे. खासगी आयटीआयमध्ये 42 हजार 521 प्रवेशासाठी जागा आहेत. एकूण प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध असल्याचे व्यवसाय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.