Breaking News

रमजान’ प्रेम आणि सदभावना वाढविणारा : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी

आपला देश सर्वधर्म समभावनेची जपणूक करणारा असून विविध परंपरा व सण आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अशाच परंपरापैकी पवित्र रमजान महिना संपल्यानंतर येणारा रमजान ईदचा सण संपूर्ण मानव जातीला प्रेम देणारा आणि सदभावना वाढविणारा आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना ते बोलत होते. ते म्हणाले, रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी केलेले व्रत, उपासना व रमजान ईद या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी शुद्ध आचरण, शुद्ध आचार, विचारातून मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठन अल्लाहच्या चरणी अर्पण होते. त्यामुळे रमजान ईद या सणाला विशेष असे महत्व आहे. कोपरगाव शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईदचा सण साजरा केला. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. 

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवकचे अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संदीप पगारे, अजीज शेख, हिरामण गंगुले, मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, अजगर खाटीक, शफिक शेख, रशीद शेख, ईस्त्राइल शेख, डॉ. तुषार गलांडे, दिनकर खरे, रमेश गवळी, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके,चंद्रशेखर म्हस्के, अॅड. मनोज कडू, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, फिरोज पठाण, चांद पठाण, संदीप सावतडकर, राहुल देवळालीकर, संतोष टोरपे आदी उपस्थित होते.