Breaking News

बेलपिंपलगाव येथे रमजान ईद उत्साहात

नेवासा तालुक्यातील बेलपिंपलगाव येथे आज मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी मस्जिदमध्ये एकत्र येवून सामुदायिक नमाज पठन केले. या वेळी सर्वांनी ईद च्या शुभेच्छा दिल्या, गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ हे रमजान ईदच्या दिवशी आपल्या मित्र मंडळीसह मस्जिद मध्ये येवून या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधवांसमवेत नमाज पठन करुण, मनोभावे जी सेवा करतात, त्यांची आपल्या हिंदू समाजाच्या वतीने सत्कार करतात.
बेलपिंपलगाव या ग्रामीण गावात सर्व धर्मीय अगदी एक कुटूंब असल्यासारखे गुण्यागोविंदाने राहतात, तसेच सामाजिक बांधिलकी व हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ हे दरवर्षी हा उपक्रम करतात.
यावेळी गावातील प्रा. समीर सय्यद, प्रा. अमिन सय्यद, मुमताज सय्यद, रफीक सय्यद, शब्बीर सय्यद, समीर तंबोली, बाबूलाल पठाण, अष्पाक सय्यद, सिकंदर सय्यद, आरिफ सय्यद यांसह दिंगबर शिंदे, चंद्रशेखर गटकळ, सुभाष साठे, राजेंद्र साठे, वसंत रोटे, विष्णु शिरसाठ, वसंत शेरकर, राहुल शिंदे, हर्षवर्धन शिंदे, राम वरघुडे, अक्षय गारुळे, बाळासाहेब शेंडगे, दत्तात्रय राऊत, दिपक चौगुले, धर्मा कनगरे यांसह नागरिक उपस्थित होते.
शेवटी प्रा. अमिन सय्यद यांनी गावातील चंद्रशेखर गटकळ व सर्व गावकरी यांचे आभार मानले.