Breaking News

राज्यात मान्सूनच्या पावसामुळे शेतकरी सुखावला येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात शनिवारी पावसाचे दमदार आगमन झाले असून, मान्सूनच्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मुंबईत पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. मुंबईत परळ, दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे.

दुसरीकडे कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. पहाटे पासून जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरु आहे. येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वसई विरार परीसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहाटे 4 पासूनच या ठिकाणी पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे वसईच्या समता नगर, साई नगर, ओम नगर, या भागात रत्यावर पाणी साचलंय. आता पावसाचा जोर कमी झालाय. तर नालासोपारा आणि विरारमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून येत होते. 
मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण. पावसाअभावी पेरण्या देखील खोळबंल्या होत्या. मात्र आता पाऊस सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात अतिवृष्टीने उच्चाकं निर्माण केला आहे. तर दुसरीकडे नाशिक अहमदनगर, औरंगाबाद, पुणे सह अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरु आहे. येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे.
रत्नागिरीसह कोकणच्या बर्‍याच भागात चांगला पाऊस झाला आहे. तसेच, येत्या 24 तासात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल रात्रभरही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसानं दमदार हजेरी लावली. ाल झालेल्या पावसानं कोकणात लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
मालवण, वेंगुर्ला, राजापूरच्या ग्रामीण भागाला पावसाचा जोरदार फटका बसला. वेंगुर्ला आणि मालवणात खाजगी आणि सार्वज निक मालमत्तांचं नुकसान झालं. सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. सिंधुदुर्गात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार 62 मीमी पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 22 पूर्णांक 75 मिलीमीटर पाऊस झाला.