प्लास्टिक बंदीला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली
।संगमनेर/प्रतिनिधी।
राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी काढलेली सरसकट प्लास्टिक बंदीची अधिसूचना आजपासून राज्यभरात सगळीकडे लागू झाली. संगमनेरात मात्र नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मिळून या प्लास्टिक बंदीला केराची टोपली दाखविली असल्याचे चित्र आहे.
संगमनेर शहरासह तालुक्यात नागरिक व व्यापारी सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असताना दिसत आहेत. संगमनेर नगरपरिषदेने याआधीच मिळालेल्या परिपत्रकानुसार शहरात प्लास्टिक बंदीची घोषणा करून टाकली. काही प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दंडही वसूल केल्याची बातमी ‘दैनिक लोकमंथन’यामध्ये यापूर्वी प्राकाशित करण्यात आली आहे. येत्या मंगळवारपासून {दि. २६} संगमनेर नगरपरिषद प्लास्टिक बंदीची हि मोहीम अधिक तीव्र करणार आहे. ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या बाळगणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष पथक नेमून त्यांच्या मार्फत कारवाई करण्यात येणार आहे.
**