मुल पळविनारी टोळी समजून 3 तरुणांना बेधम मारहाण; पोलिसांच्या मध्यस्थी नंतर तरुणाची सुटका
भंडारा, दि. 21, जून - सध्या सोशल मिडियावर मुलांचे अपहरण करून त्यांचे किडनी सह इतर अवयव काढून विकणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवाह जोर धरु लागली असून त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर ग्रामीण भागात कोणी अनोळखी व्यक्ति दिसल्यास त्या व्यक्तीकडे गावातील लोक संशयाच्या नजरेतून पाहत असतात आणि याच संशयातुन मारहानीचे प्रकार वाढले आहेत. असाच काहिसा प्रकार भंडारा जिल्यात घडला असून भंडारा शहरा लगत असलेल्या गिरोला गावामध्ये मूल पळविनारी टोली समजून गावातील लोकांद्वारे 3 युवकांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे तर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने त्या युवकांच जिव वाचला असून हे युवक इलेक्ट्रॉनिक वस्तु विकण्यासाठी गिरोला गावात गेले होते त्यांची भाषा ही वेगळी असल्याने गावातील लोकांनी त्यांना मुले पळविनारी टोली समजल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, एकंदरीत या घटने नंतर पोलिसांनी अफवाह वर विश्वास न क रण्याची विनंती केलि असून गावत आल्यानंतर गावातील पोलिस पाटील यांना माहिती देऊन व्यवसाय करण्याची सूचना करण्यात आली आहे.
