Breaking News

... तर सरकार पडू शकते शरद पवारांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत


मुंबई : देशात जर विरोधक एकत्र आले, तर सरकार पडू शकते, असे भाकित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता पवारांचे हे वक्त व्य अत्यंत महत्वाचे ठरते. ‘1977 मध्ये एका पक्षाची पडझड सुरू झाली, आणि त्यानंतर ते पडले. आज जर विरोधक एकत्र आले, तर त्याकाळची परिस्थिती आजही निर्माण होऊ शकते,’ असे सुचक वक्तव्य पवार यांनी केले आहे. 1975 मध्ये देशात आणीबाणी घोषित झाल्यानंतर 1977 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये इं दिरा गांधी सरकारचा दारुण पराभव झाला होता. त्याकाळी आणीबाणीमुळे देशात निर्माण झालेल्या असंतोषामुळे विरोधक एकवटले होते. या विरोधकांच्या एकीमुळे काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पराभव पाहावा लागला होता.
सध्या केंद्रात असणारे सरकार एकखांबी नेतृत्व चालतवत आहे अशी टीका करतानाच, 1977 मध्ये ज्याप्रमाणे विरोधकांनी एकजूट करून त्यावेळच्या सत्ताधार्‍यांना खाली खेचले होते तसेच आज सर्वच विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याने 1977 ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे पवार म्हणाले. देशात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला असल्याने सध्या असणारे जनमत लक्षात घेत समविचारी पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.