Breaking News

हवाई दलाचे विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

कच्छ/वृत्तसंस्था : गुजरातच्या कच्छ येथील बरेजा गावाजवळ मंगळवारी भारतीय हवाई दलाचे ‘जॅग्वार’ हे फायटर विमान कोसळले. या जॅग्वार विमानाने जामनगर येथून उड्डाण घेतले होते. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. एअर कमांडर संजय चौहान अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. जामनगरहून सकाळी विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण घेतले होते. त्यानंतर साधारण 10.30 च्या सुमारास बेरजा गावाजवळील माळरानावर विमान कोसळले. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही पण अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाची धडक लागून माळरानावर चरणार्‍या काही गाईंचासुद्धा मृत्यू झाला आहे. अपघाताचा तपास करण्यासाठी न्यायालयाने चौकशीचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. दरम्यान अपघातानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसर रिकामा करण्यात आला आहे.