Breaking News

अर्बन बँकेला 10 कोेटीं 44 लाखांचा निव्वऴ नफा

। स्वतःचा डाटा सेंटर असणार, सभासदांना 15 टक्के लाभांशही देणार - खा.गांधी

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - नगर अर्बन बँकेस चालू आर्थिक वर्षात 10 कोटी 44 लाख निव्वळ नफा झांला असून सभासदांना बँक 15 टक्के  लाभांश देणार  असल्याची माहिती खासदार व बँकेचे चेअरमन दिलीप गांधी यांनीं पत्रकार परिषदेत दिली. कर्मचार्‍यांचा इन्शुरन्सही बँकेने उतरविल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आर्थिक वर्षात नोटाबंदी, जनधन या योजनेच्या काळातही बँकेने सभासदांच्या हिताची पावले उचलली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. नोटाबंदीच्या  काळात आम्ही या संधीचा फायदा उठविला. सभासदांचा व्यक्तिगत संर्पक वाढला गेला. बँकेचे ठेवी वाढताहेत, कर्ज  वितरीत करण्याचे प्रमाण वाढले आहे. बँकेने  यावर्षी 72 हजार 848 लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे.
बँकेची रिकव्हरी 82 टक्के आहे. जे गेल्यावर्षीपेक्षा सुमारे 16 टक्के जास्त आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार वाढत आहे. दुसरीकडे कर्मचारी - अधिकार्‍यांच्या यांच्या  सुरक्षेसाठीत्यांचा विमा बँकेने  उतरला आहे. यंदा दिवाळाची बोनस कर्मचार्‍यांना दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे 15 टक्के लाभांश वाटप केला जाणार असल्याची  घोषणा गांधी यांनी केली. अर्बन बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 47 शाखा आहेत. त्यात आणखी वाढ केली जाणार आहे. तसा प्रस्ताव रिर्जव बँकेस दिला असल्याचे ते  म्हणाले.
कर्ज कामागारांना, पण हमी कारखान्यांची
बँकेने साखर कारखान्यातील कामगारांना कर्ज दिल्याची कबुली गांधी यांनी दिली. ते म्हणाले, साखर कारखाने हमी देत  असल्याने बँकेने हे कर्ज दिले. तथापि कर्ज  फेडण्याची जबाबदारी कारखान्यांची आहे.अर्बन बँकेने नगर तालुका, अगस्ती व जगदंबा या साखर कारखान्यांना दिलेले कर्ज फेडण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब  केला आहे. या कारखान्यांकडे 14 कोटी थकबाकी आहे. अगस्ती कारखाना चालविणारांनी आदिवासींचे प्रश्‍न सोडविले नाहीत. ते आमचे पैसे कधी लवकर देणार ?  असा टोलाही गांधी यांनी अगस्ती कारखाना चालकांना लगावला.