महत्वाकांक्षेला आत्मबळाचे पंख मिळावेत - मधुकर नवले
भविष्य घडविताना गर्दीतला ’एक’ असे हे आपले स्थान असणार नाही तर, इतरांपेक्षा ’वेगळा’ किंवा ’वेगळी’ मी ’एक’ असे स्थान निर्माण करण्यासाठी जिद्द बाळगा. यश म्हणजे केवळ मार्क्स नाहीत तर कर्तुत्वाच्या दिमाखाने जीवन संपन्न करणे म्हणजे यश प्राप्त करणे आहे. विद्यार्थी परिक्षार्थी असतोच या सूत्राने आज तुमचे यश तुम्हाला तुमच्या यशसिद्धिच्या महत्वाकांक्षेला आत्मबळाचे पंख जोडणार आहेत, त्याच पंखांना आधिक बळ लाभावे. यशवंत व्हावे, जयवंत व्हावे असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अभिनव शिक्षण संस्थेच्या मारूतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले, त्यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी संस्थेच कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी, मंदा नवले तसेच सी.बी.एस.ईच्या संचालिका प्राचार्या. जयश्री देशमुख, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी, प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, वसुंधरा अकॅडेमीचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता पराड, मुळा व्हॅली पब्लिक स्कूलच्या प्राचार्या तिलोत्तमा कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते. यशाची परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा 10 वीचा एकूण निकाल 100 टक्के लागला. यामध्ये 10 विद्यार्थी 90 टक्केंपेक्षा जास्त गुण मिळवून, 49 विद्यार्थी 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून, तर 17 विद्यार्थी फस्ट क्लास मिळवून उत्तीर्ण झाले. प्रत्येक क्षेत्रात, सह्याद्री मुलखात अभिनवचा विद्यार्थी पुढे हे ब्रीद खरे केले. म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेसाठी खेळाडू म्हणून निवड झालेल्या ओम आत्माराम शेटे व मार्गदर्शक म्हणून निवड झालेल्या क्रीडा शिक्षक निलेश गुंजाळ यांचा सन्मान येथे करण्यात आला. तसेच मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी, प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव व विद्यार्थ्यांच्या, यशात विशेष योगदान असणार्या शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी केले.