समोरासमोरील अपघातात 9 जण जखमी
अकोले तालुक्यातील रंधा गावाजवळ इगतपुरी-पुणे बस व पिक अप यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या समोरासमोर झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले असुन, जखमींना राजुर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.
इगतपुरी-पुणे ही बस रंधा पुलाजवळ घोटीकडे जाणार्या पिकपला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडकली. सुदैवाने सदर अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र तरीही 9 जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींची नावे पुढीलप्रमाणे गणेश रमेश मोरे, विठ्ठल अरूण गोरे, रोहिणी संतोष सुर्यवंशी, सुनिता बाळाहेब वाकचौरे, रंजना साहेबराव गोपाळे, सुमनबाई रखमा सुर्यवंशी, लहानबाई रमेश गोरे, प्रियंका संतोष सुर्यवंशी, तनुजा संतोष सुर्यवंशी अशी आहेत. जखमींवर राजुर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.