Breaking News

पिंपळगांव देपाच्या सप्ताहाची जय्यत तयारी


संगमनेर प्रतिनिधी 

सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाला धार्मिक आचरणाची शिकवण मिळत असते. यातून आपल्यातील धार्मिकता व एकात्मता वाढीस लागण्यास मदत होते. संगमनेरमध्ये पिंपळगांव देपा येथे होणारा प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह हा तालुक्यासाठी गौरवशाली ठरेल, असे प्रतिपादन रणजितसिंह देशमुख यांनी केले.

तालुक्यातील पिंपळगांव देपा येथे होणार्‍या प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या जागेची व तयारीची पाहणी रणजितसिंह देशमुख यांनी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत संजय महाराज देशमुख, अजित देशमुख, राजेंद्र देशमुख, नवनीत देशमुख, विलास काळे, हेमराज वर्पे आदींसह नागरिक उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. सर्व मतभेद विसरून सर्वांना एकत्र आणणारा हा मार्ग आहे. जात-पात, उच्च-निच असा भेदभाव, राजकारण हे सर्व बाजूला करुन पिंपळगांव देपा येथील हा सप्ताह नियोजनबद्ध व संगमनेरकरांसाठी गौरवास्पद ठरण्यासाठी सर्वांचाच सक्रिय सहभाग आवश्यक आहे. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक विकास कामे सुरु असून सर्व सामान्यांसाठी कल्याणकारी योजनाही सुरु आहेत.