Breaking News

सोलापूर विद्यापीठात मुलींच्या जेवणात अळ्या, कारवाई करण्यात विद्यापीठाची हतबलता

सोलापूर, दि. 27, सप्टेंबर - सोलापूर विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्‍या 170 मुलींच्या आरोग्याचा प्रश्‍न उदभवला आहे. या मुलींसाठी मेस आहे, त्यातील  नित्कृष्ट, बेचव जेवण आणि भरीत भर म्हणजे वारंवार भाज्यांमध्ये अळ्या निघणे या प्रकारांना मुली वैतागल्या आहेत. पण तक्रार कोणाकडै करणार? यातील काही  मुलींनी याची तक्रार विद्यापीठ वसतिगृह समन्वयक डॉ. अनिल घनवट यांच्याकडे केली. त्यावर बैठक घेऊन मुलींनाच समजाविण्यात आले. शांत राहण्याचा सल्ला  देण्यात आला. मार्ग काढू काही तर आपणच आपल्या विद्यापीठाची बदनामी करण्यात काय फायदा, पत्रकारांना माहिती दिली तरी ते काय करणार आहेत ? ते मार्ग  काढणार आहेत काय ? अशा शब्दात सारवासारवही करण्यात आली. प्रत्यक्षात अळी निघाल्याने मेस ठेकेदाराला साधा मेमो देण्यासाठी तीन दिवस लावण्यात आले.  1200रुपयात मेस 1200रुपये प्रती महिना या दरावर ऑगस्ट पासून मेस चालकाला ठेका देण्यात आला. रोज दोन वेळा उत्तम दर्जाचे जेवण, त्याचा मेन्यू टेंडरमध्ये  आहे. प्रत्यक्षात भाजी, चपाती, भात, पातळ आमटी याशिवाय जेवणात दुसरे काही नसते. हेच अळीयुक्त जेवण ते स्वत: खातील काय ? असा प्रश्‍न संतप्त  विद्यार्थिनींनी विचारला. आरोग्याशी हेळसांड केव्हाही समर्थनीय होऊ शकत नाही. मात्र सोयीची वस्तुस्थिती पाहणे, टेंडर मधून मिळणारी टक्केवारी लक्षात घेत काही  कारवाई करणे असेच धोरण विद्यापीठ आखत आहे, हे अनाकलनीय आहे. पुन्हाखोटेपणा, पुन्हा सारवासारव मेसमधीलजेवणाच्या दर्जाबाबत काही पत्रकारांनी  मंगळवारी दुपारी विचारणा केली. त्यावेळी त्यांना एका स्टीलच्या ताटात वांगी भाजी आणि भात - वरण आणून दाखविण्यात आले. त्याची चवही चांगली होती.  हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका विद्यार्थिनींस हेच जेवण तुम्हाला आज दिले होते का ? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर , तिने नाही असे उत्तर दिले. आज तर उसळीची  भाजी जेवणात होती असेही सांगितले. खोटेपणाची हद्द करणार्‍या समर्थ केटरर्सवर कारवाई होण्याची गरज आहे. एक ऑगस्टपासून समर्थ केटरर्स यांच्याकडे मुलींच्या  वसतिगृहातील मेसची जबाबदारी दिली आहे. रविवारी जेवणात अळी निघाल्याचा प्रकाराची माहिती विद्यार्थिनींनी दिली. यावर मेसचालकाला यापुढे असा प्रकार घडू  नये, अशा सूचना देत मेमो देण्यात आला आहे. डॉ.अनिल घनवट, वसतिगृह समन्वयक, सोलापूर विद्यापीठ