Breaking News

तालुक्यात जातीय सलोखा टिकून : प्रा. वैद्य


अकोले प्रतिनिधी
'सर्व धर्म समभाव' याचा नेहमी आग्रह धरणारे प्रेमानंद रुपवते उर्फ बाबूजी यांच्या प्रेरणेतून गेल्या १५ वर्षांपासून अकोले येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. अशा या उपक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याने तालुक्यात जातीय सलोखा टिकून असल्याचे प्रतिपादन अकोले तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. के. वैद्य यांनी केले.

अकोले शहरातील इस्लाम पेठ येथे प्रेमानंद रुपवते मित्र मंडळाच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे होते. यावेळी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, अकोले वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे, आय. टी. आयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, पोलिटेक्निकचे प्राचार्य ए. पी. शिंदे, एमबीएचे डायरेक्टर डॉ. प्रशांत तांबे, मनसेचे हेमंत दराडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल वैद्य, हेमंत आवारी, अण्णासाहेब चौधरी, मुख्याध्यापक मच्छिंद्र कानवडे, प्राचार्य उल्हास घोडे, पत्रकार अल्ताफ शेख, प्रवि ण आंबेकर, मौलाना हफीज, मैनूद्दीन शेख आदींसह मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य आरीफ तांबोळी यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.