Breaking News

सीनातील कारवाई आज संथगतीने

येथील सीनानदी पात्रातील अतिक्रमण काढण्यात आज सहव्या दिवशी कारवाई सुरु होती. नदीपात्रातील माती व गाळ काढण्यात आला मात्र आज म्हणावी अशी यंत्रसामुग्री नसल्यने काम अतिशय संथ गतीने सुरु राहिले. तर दुसरीकडे विटभट्टीचालकांना नोटीसा देऊनही विटभट्टया तशाच ठेवल्या आहे. या संदर्भात आम्ही कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगीतले.

सीनानदी पात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. अत्तापर्यत लोखंडी पुल, काटवण खंडोबा पुल तसेच नालेगाव परिसर येथील नदीपात्रातील अतिक्रणे काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे काल 3 विटभट्टयासुध्दा हटविण्यात आल्या होत्या. मात्र आजही अनेकांच्या विजभट्या या ठिकाणी तशाच राहिल्या आहेत. त्यांना नोटीसा बजावूनही म्हणावा असा उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रशासनाने आता त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. दोन शेतकर्‍यांनी आपले पिके काढून घेतले आहे. वास्तविक पाहात त्यांनीच या ठिकाणी अतिक्रण करुन शेती केल्याचे पुढे आले आहे. आज सहाव्या दिवशीसुध्दा कारवाई सुरुच होती. काल सुट्टीच्या दिवशीसुध्दा पात्रातील माती व गाळ काढण्याचे काम सुरुच होते. पाच जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई सुरु ठेवण्यात आली होती. काटवण खंडोबा ते लोखंडीपुलापर्यंतचा गाळ हा काढण्यास सकाळपासूनच सुरवात झाली होती. दिवसभर ही कारवाई सुरुच होती. आत्तापर्यत 6 हजार ब्रास माती हटविण्यात आली आहे. तर दोन ठिकाणचे उस अतिक्रणामध्ये लावण्यात आले होते. पण पहिल्यांदाच नदीपात्रातील गाळ हा दुर करुन जे अतिक्रण या पट्टयामध्ये आहे ते दुर करुन नंतरच बोरुडे मळा व वारुळाचा मारुती या ठिकाणचे अतिक्रण काढले जाणार आहेत.अ ाजच्या कारवाईच्या वेळी म्हणावी अशी यंत्रसामुग्री मिळाली नाही. त्यामुळे काम अतिशय धिम्या गतीने सुरु होती. नदीपात्रातील गाळ उपसण्याची फक्त कारवाई करण्यात आलेली होती. इतरत्र कोणतीच कारवाई आज होवू शकली नाही. विषेश म्हणजे पावसाळा सुरु होण्यापुर्वी ज्या गतीने काम होणे अपेक्षीत होते ते होताना दिसले नाही. पक्क्या अतिक्रणाचा विषय अद्यापही घेतलेला नाही. प्रशासनाने फक्त नदीपात्रातील गाळ व माती काढण्यास सुरुवात केली आहे. पुढील कारवाई करावी व सीनापात्रातील सर्व अतिक्रण दुर करावे अशी मागणी होवू लागली आहे.