Breaking News

मैदानी खेळाने आरोग्य उत्तम राहते - पाचपुते

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे साम्राज्य प्रतिष्ठान व चिचोंडी पाटील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत 27 मे रोजी सुरुवात करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये नगर तालुक्यातील 35 ते 40 क्रिकेट टीमने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या हस्ते विजेत्या टीमला बक्षीस वाटप करण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 11111 रुपये व ट्रॉफीसाठी वाळकी येथील टीम विजेती ठरली तर द्वितीय बक्षीस 7777 रुपये यासाठी चिचोंडी पाटील येथील टीम विजेती ठरली तर तृतीय बक्षीस 5555 यासाठी रुईछत्तीसी येथील टीम विजयी बक्षीस वाटपादरम्यान बोलताना माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांची तरुण मुलांचे आरोग्य उत्तम राहून मैदानी खेळामुळे शरीराला चालना मिळते तरुण पिढीसाठी स्पर्धा म्हणजे जीवनाला कलाटणी देणारा मोठा संघर्ष असतो स्पर्धेमध्ये विजय व हरणे हे निश्‍चित असते मात्र हरूनही त्याच उमेदीने पुन्हा लढा देण्यास सुरुवात करणे यात मोठा विजय लपलेला असतो असे मत व्यक्त केले साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मनोज कोकाटे या स्पर्धेचे आयोजन केले होते बक्षीस वितरण दरम्यान बोलताना मनोज कोकाटे म्हणाले सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त आहे मैदानी खेळ हा तरुण पासून दुरावत चाललेल्या असून यामुळे विद्यार्थी मैदानी खेळकडे आकर्षित होत नाहीत तरुण पिढीने मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळून आपले शरीर सुदृढ आणि भक्कम बनवायला हवे असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले