Breaking News

एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती



मुंबई : एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत एनसीपीएच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक कला सादर करण्यात आल्या.

या सांस्कृतिक कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी चे विनोदा, केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.