Breaking News

पसायदान विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


नेवासाफाटा(प्रतिनिधी) 
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराजप्रबोधन प्रतिष्ठान संचलित उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर हे स्वबळावर चालवीत असलेल्या पसायदान विद्या मंदिर या विद्यालयातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आदित्य केयर एज्युकेशन सोसायटीचे मुख्य प्रबंधक अनिल गुप्ता नवी दिल्ली यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यावेळी झालेल्या झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी शनैश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष दादासाहेब दरंदले,सप्तशृंगीदेवस्थानचे प्रमुख हभप विजय महाराज खेडकर, सेवेकरी रघुनाथ नाचन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पसायदान विद्या मंदिर हे विद्यालय शिक्षणाला अध्यात्माची जोड देणारे एकमेव विद्यालय असून येथे शाळेबरोबरच आध्यात्मिक शिक्षण मुलांना दिले जाते या शिक्षण संस्थेतून तयार होणारा विद्यार्थी हा सुसंस्कृत व गुणवंत होऊनच बाहेर पडावा या दृष्टीने प्रयत्न असल्याने त्यासाठी स्वतः उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर हे सर्व यंत्रणेवर नजर ठेवून असतात असे प्रास्ताविकात रघुनाथ नजन यांनी सांगितले.वर्षभर विविध उपक्रमाद्वारे शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे हभप उद्धव महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.