Breaking News

पो. उपनिरीक्षकपदी अमोल गुंजाळ

पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील अमोल गुंजाळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल चोंभूत येथील श्री गणेश कृषी उद्योग समुहाचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्तात्रय म्हस्के यांनी त्यांचा सत्कार केला. 
म्हस्के म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी होण्याची जिद्द असते, हे अमोल याने दाखवून दिले. केवळ योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. अमोल हा गावातील पहिलाच अधिकारी असुन त्याने, त्यासाठी त्यांच्या परिवाराने मेहनत घेवून त्यास पाठबळ दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर चोंभुत गावाने अमोल अधिकारी झाल्याचे पाहिले. यावेळी किरण म्हस्के, लक्ष्मण कोल्हे, संतोष फापाळे, पप्पू पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.