पारनेर तालुका शिक्षकसेना प्रमुखपदी भाऊसाहेब भोगाडे
पारनेर तालुका शिक्षकसेना प्रमुखपदी भाऊसाहेब भोगाडे यांची निवड पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांंताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून नुकतीच निवडीची घोषणा करण्यात आली. भाळवणी येथील शिवसेना प्रशिक्षण शिबिरात आ. विजय औटी यांच्या हस्ते भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे यांना पारनेर तालुका शिक्षकसेना प्रमुखपदी निवडी झाल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी आ. निर्मला गोरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संजय चव्हाण, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, जि.प.सदस्य काशिनाथ दाते, मा. सभापती गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, अनिकेत औटी, महिला आघाडीप्रमुख उमा बोरूडे व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.