Breaking News

वृक्षारोपणासह संवर्धन काळाची गरज : वनक्षेत्रपाल सिंगल

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असुन, विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन कर्जतचे वनक्षेत्रपाल एन.एम सिंगल यांनी केले. बंडगरवस्ती जि. प. प्राथमिक शाळेत ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या पन्नास कोटी वृक्ष लागवड या उद्दिष्टपूर्तीसाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी कर्जतच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सिंगल पुढे म्हणाले, वृक्षांना कमी पाणी असले तरी, चालते पण त्याचे संवर्धन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. लागवड केलेल्या वृक्षांना शेळ्या, मेंढ्या व जनावरे खाणार नाहीत याची काळजी समाजाने घेतली पाहिजे.
प्रात्यक्षिक करून दाखवले. बंडगरवस्ती शाळा डोंगराळ भागातील आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नसते. मात्र येथील शिक्षकांनी शाळेत चांगल्या प्रकारे वृक्षांचे संवर्धन केलेले असुन, हे आदर्श उदाहरण आहे. आपल्याला निरोगी जीवन जगायचे असेल तर, निरोगी हवा व भरपूर ऑक्सिजन मिळेल, मात्र जर आपण वृक्ष संवर्धन केले नाही तर, तापमानात वाढ होवून पर्यावरणाचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंगल यांनी केले. बंडगरवस्ती शाळेसाठी पन्नास औषधी वनस्पती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाटेवाडीचे उपसरपंच विठ्ठल बंडगर, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष तात्याबा हंडाळ, विक्रम अडसूळ, कविता बंडगर, नवनाथ बंडगर, चंद्रकांत बंडगर, धुळाजी भिसे, बाबा बंडगर, परमेश्‍वर बंडगर तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.