Breaking News

कोतुळ परिसरात वादळी पावसाचे थैमान लाखो रूपयांचे नूकसान,

अकोले / निरंजन देशमुख।  अकोले शहरासह तालुक्यातील कोतुळ परिसरालाही वादळी पावसाने चांगलेच झोडपुन काढले. दोन तास झालेल्या वादळी पावसाने होत्या चे नव्हते झाले. काही ठिकाणी असणार्‍या कांदा चाळी उडाल्या तर, काही शेतकर्‍यांचे उभे पिक जमिनदोस्त झाले. जुने हॉटेल एन्जॉयचे वादळी पावसाने नूकसान झाले. तसेच भाऊ देशमुख यांच्या घरावर विजेचा खांब पडला, सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.
रामनाथ देशमाने यांच्या कांदा चाळिचे नूकसान होऊन कांद्यांचेही नूकसान झाले. रस्त्यांवर शेजारी असणारी झाडे उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब पडल्याने विजपुरवठा बंद झाला आहे. कोतुळ परिसरातील अंभोळ, पैठण, भोळेवाडी, मोग्रस, धामणगावपाट या गावांना देखील पावसाचा तडाखा बसला. घरांची छप्परे, कांदाचाळी जमिनदोस्त झाल्या. उभी असणारी पिके आडवी झाली. त्याबरोबरच काही काळ गारांचादेखील तडाखा बसल्याने टोमॅटो, डाळिंब, भाजिपाल्याचे प्रचंड नूकसान झाले. कोतुळ पेट्रोलपंप रोडवर काही काळ झाडे पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. संत कोंडाजीबाबा महाविद्यालयाचे छतदेखील वादळी पावसाने उडून गेले. जुन्या हॉटेल एन्जॉयमध्ये रामनाथ देशमाने यांनी कांदा साठवला होता. वादळी पावसाने हॉटेलचे छत शंभर फुटावर उडून पडले. त्यामुळे बाळासाहेब घाटकर आणि रामनाथ देशमाने यांचे लाखो रूपयांचे नूकसान झाले. वादळी पावसाने नूकसान झालेल्या शेतकर्‍यांना नूकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.