Breaking News

खासदार चषक राज्यस्तरीय बास्केट बॉलस्पर्धेसाठी 800 खेळाडू व 100 हून अधिक पंच साता-यात

सातारा, दि. 03, जून - महाराष्ट्र राज्य बास्केट बॉल असोशिएशन ,सातारा जिल्हा बास्केट बॉल असोशिएशन ,रणजीत अ‍ॅकॅडमी सातारा व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवस सुरु असलेल्या 16 वर्षाखालील मुलामुलींसाठी आयोजित खा. श्री.छ.उदयनराजे भोसले खासदार चषक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत 59 संघांचे तबब्ल 800 खेळाडू सध्या सातारा येथे खेळत आहेत. तर या स्पर्धांसाठी संपूर्ण राज्यातुन 100 हुन अधिक पंच ,संघटनेचे पदाधिकारी परीश्रम घेत आहेत. सुरु झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धां 6 जून अखेर येथील शिर्केशाळा संघाचे संभाजी राजे क्रिडा संकुल मैदानावर व श्री.छ.शाहू क्रिडा संकुल येथे सुरु रहाणार आहेत. 

दरम्यान स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ठाणे विरुध्द सोलापूर या मुलींच्या सामान्यात हा सामना केवळ एक गुणाची आघाडी घेत ठाणे संघाने जिंकला. सामन्याचा अंतिम गुण फलक होता 29 विरुध्द् 28 .या सामन्यात मेलेडी मेनेझने 10 गुण, नायरने 5 गुण मिळवले, तसेच गार्गी गायकवाडने सुरेख खेळ केला. सातारा विरुध्द गडचिरोली सामन्यात सातारा संघाने 31 गुण करत 18 गुणावर गड चिरोलीला रोखत हा सामना जिंकला. यानंतरच्या सातारा विरुध्द कोल्हापूरच्या सामन्यात साताराने हा सामना जिंकला यामध्ये चैतन्या राजेने 11 , अविशा गुरव ने 9 तर कोल्हापूरच्या अश्‍विनी चरणकर ने 7 गुण केले. 
उस्मानाबाद विरुध्द् सिंधूदूगर्ं या मुलींच्या सामन्यात सिधूंदूर्गने 20 गुण करत 20 गुणांनी हा सामना सहजपणे जिंकला. कारण या सामन्यात उस्मानाबादला आपला भोपळाही फोडता आला नाही.वर्धा विरुध्द चंद्रपुरच्या मुलींच्या सामन्यात वर्धाने 19 गुण करत 9 गुणावर चंद्रपूरला रोखले व विजय मिळवला. यात चंद्रपुरच्या मृणाल खुटेमटेने 4 गुण मिळवले व अनुश्री गोडबोलेने चांगला खेळ केला. मुलांच्या सातारा विरुध्द् गडचिरोली समान्यात 31 विरुध्द 18 गुण संख्या अखेरीस असताना हा सामना सातारा संघाने 13 गुणांच्या फरकाने जिंकला. यात यश राजेमहाडिकने 9 , विवेक बडेकरने 10 तर गडचिरोलीच्या श्रेयस चुटेने 10 व शुभम कनकेने 5 गुण मिळवले. रंगलेल्या पुणे विरुध्द् बीड सामन्यात 57 गुण करत पुणेने बीडला 26 वर रोखत नमवले. यात पुण्याच्या ज्ञानेश पाटीलने 5 ,ओजस आंबेडकरने 9 तर बीडच्या जी. ए. धोत्रेने 14 व गरजे ए. व्ही. ने 4 गुण केले. सातारा विरुध्द कोल्हापुरच्या मुलांच्या सामान्यात 34 गुण करणा-या सातारा संघाने क ोल्हापुर संघाला 18 वर रोखले. यात यश राजे मसहाडिकने 13 दीप अवरीकरने 9 विवेक बडेकरने 9 तर कोल्हापुरच्या सौरभ जंगमने 5 ,वसिम मुल्लाने 5 गुण केले. गडचिरोली विरुध्द जळगाव साम्नयात गडचिरोली 44 गुण करत 6 गुणांर्चीं आघाडी घेत जळगावला हरवले. यात श्रेयस चुटेशने 13 , प्रतिक तरम ने 11 तर जळगावच्या भटटु अग्रवाल व वासिम शेखने प्रत्येकी 10 गुण नों दवले.