पाहुण्यांचा मानसन्मान करणे ही अभिनवची परंपरा - नवले
अभिनव शिक्षण संस्थेत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून, त्यांचा मानसन्मान करणे ही अभिनवची जूनी परंपरा असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी केले.राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि. पी. वाय. कादरी यांनी पहिल्यांदाच अभिनव शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, रजिस्टर दिलीप मंडलिक यांनी कादरी यांचे स्वागत केले. अमोल शिर्के यांनी एपीआय कादरी यांचा संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांच्याशी परिचय करून दिला. यावेळी नवले म्हणाले की, अकोले तालुक्यात नवीन येणारा अधिकारी आमच्या संस्थेत येतोच. मग त्याची आमच्या संस्थेशी घट्ट नाळ जुळते.अकोले पोलीस ठाण्याचे पूर्व पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे हे आमच्या संस्थेत कायम असायचे. संस्थेच्या यापुढील एखाद्या कार्यक्रमास तुम्ही आमचे प्रमुख पाहुणे असाल, असेही मधुकर नवले यांनी सांगितले. यावेळी कादरी यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अभिनव शिक्षण संस्थेतील हा पाहुण्यांचा सन्मान पाहून एपीआय कादरी भारावून गेले.
