Breaking News

‘जेएनयू’मधील देशविरोधी घोषणांना हाफिजचे समर्थन- गृहमंत्री

नवी दिल्ली, 14 - देशविरोधी घोषणाबाजी करून देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणा-यांना आमचे सरकार माफ करणार नाही. जेएनयूमध्ये जे काही घडले त्याला हाफिज सईदचे समर्थन होते. हा प्रकार अत्यंत दुदैवी आहे,  असेही राजनाथ सिंह म्हणाले.  
देशाने हे सत्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतविरोधी घोषणा दिल्या जात असताना सर्व देशाने त्याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे. तसेच, राष्ट्रविरोधी घोषणा करणा-यांना सरकार सोडणार नाही, असेही ते म्हणाले. मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी दहशतवादी अफजल गुरु आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सह-संस्थापक मकबूल भटच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. 2013 साली अफजल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केली होती.