Breaking News

‘जळगाव’ आणि ‘लातूर’प्रकरणी चक्काजाम आंदोलन

राहुरी ता. प्रतिनिधी - गेल्या महिन्यात जळगांव व लातूर जिल्ह्यात झालेल्या अन्यायाविरोधात आज {दि. २०} जून सकाळी विविध संघटनांच्यावतीने राहुरी शहरातून मोर्चा काढण्यात आला. नगर-मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. यासंदर्भात तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर राजेंद्र जगधने, कांतिलाल जगधने, सचिन साळवे, सोन्याबापू जगधने, पापाभई बिवाल, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, अन्वर सय्यद, सोमनाथ जगधने, निलेश जगधने, नरेंद्र मोरे, सुनिल चांदणे, सुनिल शेलार, शंकर बनसोडे, रमेश जगधने, सुर्यकांत वाकचौरे, भानूदास बोरुडे आदिंच्या सह्या आहेत.