डिग्रस येथे जनआरोग्य शिबिर उत्साहात
आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय अहमदनगर, श्री सिद्धेश्वर ज्ञानपीठ व संशोधन केंद्र डिग्रस व संगमनेर मेडिकल फौंडेशन व रिसर्च इन्स्टिट्यूट संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अशोक इथापे व महाराष्ट्र राज्य क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
अध्यक्षस्थानी सुयोग फाऊंडेशनचे बापुराव भोर होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ उंबरकर, डॉ. बोऱ्हाडे, सुभाष पवार, मच्छिंद्र होडगर, शंकर बिडगर, मारुती पुणेकर, श्रीमती पंडित, मनसुखलाल भटिया, शिव चोराडिया आदी उपस्थित होते. यावेळी कै. यादवबाबा सेवाभावी संस्थेच्या रक्तदान शिबीर, व्रुक्षारोपन, व्यसनमुक्ती शिबीर, युवक युवतींना मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबीर अशा विविध उपक्रमाची व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अमित हळनोर, किशोर होडगर, संपत खेमनर, निवृत्ती बिडगर, मारुती खेमनर, अशोक खेमनर, सावळेराम बिडगर, तबाजी रुपनर, गवराम वावरे, सोन्याबापू होडगर, शिवा नान्नर, लहानु मदने आदिसह ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोळपे यांनी केले. गंगाधर होडगर यांनी आभार मानले.