Breaking News

'७० वर्षानंतर' लघुपट प्रिमिअरचे आज आयोजन


।संगमनेर/प्रतिनिधी।
उपेक्षित शेतकरी व वंचित विद्यार्थ्यांच्या क्रांतीचा एल्गार म्हणून वृत्तपत्र विद्या विभाग, संगमनेर महाविद्यालय आयोजित रंगकर्मी फिल्म्स प्रस्तुत ‘७० वर्षानंतर’ या लघुपटाचा प्रिमिअर शुक्रवारी (दि. २९ ) सायंकाळी सहा वाजता आयोजित कारण्यात आला आहे. संगमनेर महिविद्यालयातील साईबाबा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे,अशी माहिती रंगकर्मी फिल्म्स संस्थेचे अध्यक्ष अंतून तथा बाळासाहेब घोडके यांनी दिली.

संगमनेर येथील ख्यातनाम रंगकर्मी डाॅ. सोमनाथ सातपुते यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाच्या प्रिमियम शोचे उदघाटन विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आ. डाॅ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सत्यशोधक शेतकरी चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष किशोर ढमाले, चित्रपट समीक्षक व लेखक अनिल म्हमाने, सामाजिक चळवळीच्या समिक्षीका व प्रसिद्ध लेखिका प्रा. करूणा मिनचेकर आणि विशेष अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे उपस्थित राहणार आहेत.

या लघुपटाच्या प्रिमिअर शोच्या कार्यक्रमास सामाजिक चळवळीत सहभागी सर्व संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येथील रंगकर्मी फिल्म्सचे उपाध्यक्ष अॅड. अनिलकुमार आरोटे, सचिव तृप्ती घोडके, खजिनदार नंदिनी बागुल, सदस्य व रंगकर्मी डाॅ. अमित शिंदे, अरूण शहरकर, सूर्यकांत शिंदे, प्रा. सुशांत सातपुते, डाॅ. प्रभाकर खर्डे, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. देशमुख यांनी केले आहे.