भानसहिवर्यात ख्रिस्तीबांधवांची प्रार्थना सभा उत्साहात
नेवासाफाटा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय प्रार्थना सभेची नुकतीच उत्साहात सांगता झाली. श्रीराम हायस्कूल प्रांगणात सलग तीन दिवस सायंकाळी या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमधुर गीते गात प्रार्थनेद्वारे आजारी लोकांसाठी आरोग्यदानाची प्रार्थना करण्यात आली. प्रार्थना सभेप्रसंगी औरंगाबाद येथील पास्टर प्रवीण बोर्गे, पुणे येथील पास्टर विजय पवार, सिस्टर पल्लवी पवार, पास्टर सनी विश्वास यांनी प्रवचनासह स्तुती आराधनेद्वारे उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमाचे आयोजक नेवासा येथील पास्टर प्रकाश चक्रनारायण, पास्टर सुभाष चक्रनारायण यांनी भक्तिगीते गाऊन उपस्थीत हजारो भाविकांचे स्वागत केले.
यावेळी प्रार्थना सभेच्या झालेल्या सांगता प्रसंगी पास्टर अनिल वंजारे, रेव्हरंट डेव्हीड राक्षे, पास्टर संजय गोरे, पास्टर कांबळे, पास्टर विजय गोरे, पास्टर संजय सरोदे, पास्टर मकासरे, पास्टर विशाल शेलार, पास्टर शिवाजी मगर, पास्टर राजगुरू, पास्टर संभाजी देहडे, रेव्हरंट संतोष वंजारे, पास्टर जी.एस.साळवे, पास्टर शमुवेल मकासरे, पास्टर मंगेश साळवे, पास्टर कचरू शेलार, पास्टर नंदू मकासरे, पास्टर जॉन मकासरे, पास्टर आर.बी. गायकवाड यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
तीन दिवसीय प्रार्थना सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नेवासा तालुका पास्टर फेलोशिपच्या सदस्यांनी तसेच भानसहिवरा येथील मसीहा ग्रुप, सत्यसेवक तरुण मंडळ सदस्यांनी विशेष सहकार्य केले. तर उपस्थित भाविकांचे प्रार्थना सभेचे आयोजक नेवासा येथील पास्टर प्रकाश चक्रनारायण पास्टर सुभाष चक्रनारायण यांनी आभार मानले.