Breaking News

फैजपूरात केळी खोडातून विषबाधा ; 15 गुरांचा मृत्यू



जळगाव - जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरातील खिरोदा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ केळीचे खोड खाल्ल्याने विषबाधा होऊन 12 ते 15 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. दरम्ययान गुरांना केळीची खोड खाल्याने विष बाधा होऊन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पशुधन मालकांनी गुरे चारण्यासाठी स्मशानभूमी जवळील मोकळ्या मैदानात 100 च्या जवळपास एकत्र आणलेली होती. या गुरांना केळीचे खोड खाण्यासाठी देण्यात आली होती यातील काही गुरांनी केळीचे खोड खाल्ल्याने त्यांच्या तोंडाला फेस येऊन गुरे खाली कोसळू लागली. या घटनेत 12 ते 15 गुरे दगावली तर अन्य गुरांना तातडीने केळीचे खोड खाण्यापासून वाचवण्यात आले. के ळी खोड खाल्यामुळे विष बाधा होऊन ही गुरे दगावल्याची चर्चा आहे.