Breaking News

समद खान फ्रेंड सर्कलच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार


अहमदनगर (प्रतिनिधी) 
मुकुंदनगर येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी अनम आजिम शेख हीला बोर्डाच्या परिक्षेत 89.20 टक्के गुण मिळाले असता समद खान फ्रेंड सर्कलच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक समद खान, खालिद शेख, नवेद शेख, हारुन भाई, अजमत खान, अन्सार शेख, अकबर शेख आदी उपस्थित होते.
समद खान म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजात अनेक गुणवंत विद्यार्थी असून, परिस्थिती अभावी ते उच्च शिक्षण घेत नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी व ध्येय गाठण्यासाठी उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गरजू गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक खर्च व इतर सुविधा पुरविण्यासाठी समद खान फ्रेंड सर्कल पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.