Breaking News

महिलांनी मुख्याधिकांर्‍यासमोर वाचला समस्यांचा पाढा


राहुरी प्रतिनिधी 

नगरपालिकेत शाहूनगर भागातील मोठय़ा संख्येने आलेल्या सुजान महिलांनी पाणी, रस्ते, वीज, आरोग्य विषयी मुख्याधिकार्‍यांकङे समस्या मांडून निवेदन दिले. मुख्यधिकार्‍यांनी व विरोधी नगरसेवकांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 

त्याचबरोबर महिलांनी साचलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी मुख्यधिकार्‍यांकङे केली. दरम्यान, प्रभाग क्र. एकमधील सत्ताधारी नगरसेविकेच्या पतीराजांनी स्वतःच्या टेंशनपायी महिलांवरच तोंडसुख घेतले. तुम्हाला कळत नव्हते का, कुठे प्लाॅट घ्यावेत आणि कुठे नाही? कुठे घर बांधावेत आणि कुठे नाही? स्वस्तात जागा घेतल्या आणि अतिक्रमणाच्या जागेवर घरे बांधली. यावर संतप्त झालेल्या महिलांनी नगरसेविकेच्या पतीराजास चांगलीच खडे बोल सुनावले. मते मागायला या, मग पाहुण घेऊ, असा सज्जड दम व इशाराही महिलांनी या महाशयास दिला. 

चौकट 

यांच्या दिमतीला अग्निशामक बंब 

नगरसेविकेचे पती असलेले हे महाशय स्वतःला फार शहाणे समजतात. कोणाच्या जीवावर हे कायम जनतेबरोबर व नगरपालिकेच्या अधिकार्‍यासोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असतात? अहो, जनतेला वेळेवर हंडाभर पाणी प्यायला मिळत नाही आणि महाशयांच्या दारात कायमच यांच्या दिमतीला अग्निशामक दलाचे बंब उभे असतात.