Breaking News

श्रीलंका महापूर : भारतीय नौदलाची मदत; परराष्ट्र मंत्र्यांकडून आभार

कोलंबो, दि. 28 - श्रीलंकेत आलेल्या महाभयंकर महापूराच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय नौदलाचे एक जहाज सर्व सामुग्रीसह मदतीसाठी आज येथे पोहोचले. 2003 नंतर आता आलेल्या महापुरात मृतांचा आकडा 100 वर पोचला आहे.
अत्यंत कमी वेळात जलद गतीने मदत व साहित्य पाठवल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. यातून भारत व श्रीलंका यांच्यातील संबंध चांगले असल्याचे द्योतक आहे, असे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री रवि करुणानायके म्हणाले. ॠआयएनएस किर्च’ हे जहाज मदतीसाठी कोलंबोला पोहोचले. भारतीय उच्चायुक्त तरनजीत सिंग संधू यांनी हे जहाजातून आणलेली सामुग्री श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे सुपूर्द केली. भारतीय नौदलाचे ॠआयएनएस शार्दुल’ व ॠआयएनएस जलाश्‍व’ ही दोन जहाजेही खाद्यपदार्थ, औषधे व पाण्यासह अन्य साहित्य घेऊन श्रीलंकेला रवाना करण्यात आली आहेत.