अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना हटवले
नवी दिल्ली, दि. 13 - अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योति प्रसाद राजखोवा यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या आदेशानुसार राजखोवा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. राजखोवा यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर, मेघालयचे राज्यपाल वी षणमुगनाथन यांची प्रभारी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आले.
वास्तविक, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट हटवून काँग्रेसला पुन्हा सरकार बनवण्याच्या सर्वोच्च न्यायालायच्या आदेशानंतर राज्यपालांची खुर्ची धोक्यात आल्याचे बोलले जात होते. विरोधी पक्षांनीही सातत्याने हा मुद्दा उठवून राज्यपालांना परत बोलवण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 13 जुलै रोजी काँग्रेसला पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करण्याचे आदेश देत, राज्यपालांच्या निर्णयाला अपात्र ठरवलं होतं.
राज्यपाल राजखोवा यांनी राष्ट्रपती राजवट लागू करून नवीन सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. यावेळी काँग्रेसचे बंडखोर आमदार कलिखो पुल यांनी मुख्यमंत्री पदी वर्णी लागली होती. पण राज्यातील हे सरकार बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला पुन्हा सत्ता स्थापनेचे आदेश दिले. काँग्रेसने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसातच कालिखो पुल यांनी आत्महत्या केली होती.