‘त्या’ 7 मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन
चेन्नई - थुथुकूडी गेल्या आठवड्यात झालेल्या स्टेरलाइट आंदोलनाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या सात जणांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. उरलेल्या 6 मृतदेहांचे जतन करायलाही न्यायालयाने सांगितले आहे. 25 मे रोजी तमिळनाडू सरकारने हिंसाचाराबद्दलचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला. 22 मे रोजी कंपनीच्या विस्तारिकरणाच्या प्रकल्पाविरोधी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 13 लोकांचा जीव गेला होता, तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.