मोदी सरकारवर जनता नाराज : केजरीवाल
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. आज आलेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांवरून दिसून येते, की जनता मोदी सरकारवर नाराज असून ती मोदी सरकारला हटविण्यास इच्छूक आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे. ते आतापर्यंत त्यांच्या जवळ काय पर्याय आहे, हे सांगत होते. मात्र आता ते म्हणत आहेत, की मोदी पर्याय नाहीत. ते त्यांना हटविण्याची भाषा बोलत आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. एकूण 10 राज्यांत, चार लोकसभा आणि 10 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.