Breaking News

पावसाच्या तडाख्यात 5 जणांचा मृत्यू राजधानी मुंबईसह राज्याला जोरदार पावसाचा


मुंबई - राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शहरातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले असून प्रवाशी वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, वादळी पावसाच्या घटनात पाच जणांना आपले जीव गमवावे लागल्याची भीती अधिकार्‍यांनी वर्तविली आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच शहराच्या सखल भागांत  मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. वडाळा, दादर, मालाड, कुर्ला, सांताक्रूझ या भागाला मोठा फटका बसला आहे. हार्बर मार्गवर कुर्ला ते टिळकनगर स्टेशन दरम्यान रुळावर पाणी साचले आहे. यामुळे कुर्ला पूर्व ते लोक मान्य टिळक टर्मिनसला जाणार्‍या प्रवाशांना पाण्यातून जावे लागत आहे तर हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला, लोकलवर परिणाम. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आहे. पालिकेने पंप लावले आहेत पण पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होत आहे.