5.43 कोटी वृक्ष लागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डतर्फे दखल
मुंबईे, दि. 10, डिसेंबर - राज्याचे वनक्षेत्र 20 टक्क्यावरून 33 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी हरीत महाराष्ट्र ही संकल्पना राबवत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2017 ते सन 2019 या 3 वर्षाच्या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला आहे. सन 2017 मध्ये 1 ते 7 जुलै या आठवडयात 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.
4 कोटी वृक्षारोपणाचे हे उद्दिष्ट पार करून 5.43 कोटी विक्रमी वृक्षारोपण राज्यात करण्यात आले. लिम्का बुक ऑफ रेकार्ड या जागतीक संस्थेने या कामगिरीची पुनश्च दखल घेतली असुन जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतुबदल, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष आणि इतर नैसग्रिक आपत्ती यांची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही, ही बाब जागतिक स्तरावर मान्य झाली आहे. या आधीही राज्यात झालेल्या 2 कोटीहून अधिक वृक्ष लागवडीची दखल लिम्का बुक ऑफ रेकार्डने घेतली आहे हे विशेष.
