जिल्ह्यातील 144 प्रकल्पांत 96.76 टक्के पाणीसाठा
बीड, दि. 10 - जिल्ह्यात एकूण 144 प्रकल्प आहेत. पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के इतकाच पाणीसाठा राहिला होता. मात्र, यावर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल 125 टक्के पाऊस झाल्याने 144 पैकी 132 प्रकल्प तुडुंब भरले असून सर्व प्रकल्पांमध्ये मिळून आजघडीला 96.76 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाईची चिंता मिटल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.
जिल्ह्यात माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. याशिवाय 16 मध्यम, तर 126 लघुप्रकल्प असे एकूण 144 प्रकल्प आहेत. यापैकी माजलगाव व मांजरा हे दोन मोठे, महासांगवी, कडा, बिंदुसरा, सिंदफणा, बेलपारा, तलवार, कांबळी, रूटी, कडी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका आदी 15 मध्यम प्रकल्प भरले असून तब्बल 115 लघुप्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील 144 प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता 1140.25 दलघमी इतकी आहे. यापैकी 891.56 इतका एकूण उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाणी साठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 1107.47 दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी 862.63 दलघमी म्हणजेच 96.76 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.