Breaking News

मुझफ्फरनगर बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी


मुजफ्फरनगर - उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे एका भंगाराच्या दुकानात झालेल्या बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू, तर 3 जण जखमी झाले आहेत. सारवत रोड परिसरातील भंगाराच्या दुकानात काही लोक भंगार तोडण्याचे काम करत असतानाच ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले. मृत्यू झालेल्यांमध्ये भंगार काम क रणारा ताझिम (50) आणि शाझाद (55) यांचा समावेश असून युसुफ, नवाजीश, नौशाद, शोयब आणि कैसर बेगम जखमी असल्याची माहिती सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे सर्कल अधिकारी हरिश भदोरिया यांनी दिली. जखमी झालेले लोक घटना घडली तेव्हा दुकानाच्या जवळून जात होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या साहित्याचीही ओळख पटली आहे.