Breaking News

जमिनीचा भाग खचल्याने दबल्या 15 कार

अँटॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ जमिनीचा मोठा भाग खचला. या घटनेत जवळपास 15 कार दबल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे प रिसरातील बांधकामाविषयी स्थानिकांनी तक्रारी करूनही पालिकेने आजवर डोळेझाक केली आहे. लॉईड्स ईस्टेटच्या कंपाऊडजवळ शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ’दोस्ती एकर्स’ ला बीएमसी अधिकार्‍यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेमुळे शेजारच्या इमारतीनांही यामुळे धोका निर्माण झाला. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. अशा प्रकारांवर कारवाई न झाल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची चिंता स्थानिकांना भेडसावत आहे.